Yashwant Apte

An octogenarian from Pune, making Sri Yogeshwari Devi’s ‘Taak’ and Mahalakshmi and Parshuram idols.

श्री यशवंत रामचंद्र आपटे ह्यांचा जन्म ९ जून १९४० ला झाला. त्यांनी हायर सेकंडरी सर्टिफिकेट संपादिले आहे. LIC Of India मध्ये पुण्यात मार्केटिंग विभागात ते कार्यरत होते. ते उत्तम ज्योतिषी(Creative Astrologer )आहेत. (पिंपरी, पुणे-18, 9226483109)

सोबत ते लेखक असून त्यांची ज्योतिष विषयक २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

तसेच उत्तम रित्या श्री आपटे श्री अंबाजोगाई देवी, महालक्ष्मी देवी व भगवान परशुराम ह्यांच्या मुर्त्या बनवतात. मागणी असल्यास भक्तांसाठी रवाना करतात.

Sri Yogeshwari and Parshuram Idols
Sri Yogeshwari and Parshuram Idols

ते सांगतात, “उपरती झाली म्हणून श्री देवी अंबाजोगाई (योगेश्वरी) ची मूर्ती 12 वर्षापूर्वी कारागीर शोधून केली. प्रथम तीन मूर्ती केल्या. मी,माझा भाऊ व मित्र ह्याच्या साठी! पण नन्तर लोकांच्या आग्रहास्तव पूर्ण साचा करूनच जास्त मूर्ती मोरादाबाद येथूनच केल्या. देवी कृपेनं अनुकूल वातावरण होते म्हणून आर्थिक गुंतवणूक केली. भक्तांकडे देवी मूर्ती असावी असा भाव होता. मला भक्त पण भरपुर शुभेच्छा व आशीर्वाद देतातच. त्याच बरोबरच ईतर साडेतीन शक्ती पीठ मूर्त्या व भगवान श्री परशूराम मूर्ती पण ऑर्डर प्रमाणे केल्या जातात.

मी बऱ्यापैकी Creative Astrologer आहे. पुर्ण पत्रिकेचे विश्लेषण करतो. चांगला अनुभव येतो. पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तिसर्‍या पुस्तकाची तयारी करत आहे.”

श्री आपटे ह्यांची प्रकाशित पुस्तके:

१. ज्योतिष शास्त्रातील विविध योग (in alphabetical order)
२. बारा ग्रह बारा भाव, बारा राशी व बारा भानगडी

Leave a comment